Antarpaat Serial : कलर्स मराठी ची नवीन आगळी वेगळी मालिका!

Antarpaat Serial : मागील काही दिवसांपासून कलर्स मराठी नवनविन मलिकांचे टीज़र सोशल मीडिया वर पोस्ट करत आहे. तस तर मराठी मलिकांच्या टीआरपी च्या लिस्ट मध्ये कलर्स मराठी सतत पिछाडीवर असते. मागील काही दिवसात झी मराठी च्या ‘ चला हवा येऊ द्या ‘ हा शो बंद झाला, आणि त्याचाच फायदा घेत कलर्स मराठीने निलेश साबळे आणि काही कलाकारांना सोबत घेऊन ‘ हसताय ना हसायलाच पाहिजे! ‘ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले.

त्यानंतर लगेच कलर्स मराठी ने नवीन मालिका येत असल्याची घोषणा केली, ती म्हणजे ‘ अबीर गुलाल’ . या मालिकेमध्ये गायत्री दातार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मागच्या आठवड्यात कलर्स मराठी वर एक नवीन मालिका चालू झाली ती म्हणजे. ‘ सुख कळले ‘ या मलिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला स्पृहा जोशी आणि सागर देशमुख पाहायला मिळत आहेत.

आता कलर्स मराठी ने आपल्या सोशल मीडिया वर एक प्रोमो टाकून आणखी एक नवीन मालिका येत असल्याची घोषणा केली आहे. मालीकेच नाव आहे, ‘ आंतरपाट ‘ . सोशल मीडिया वर या मालिकेचा प्रोमो अगदी हटके कैप्शन टाकून प्रसिद्ध करण्यात आला आहे, कॅप्शन मध्ये एस लिहील आहे की, ” नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट. ” या प्रोमो ला प्रेक्षकांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

antarpaat news serial

प्रोमो मध्ये नेमक काय आहे?

प्रोमो मध्ये लगीन घाई चालू आहे, आणि हळदीचा दिवस आहे, आणि नवरी म्हणतेय की, लव मैरिज च्या काळात मी अरेंज मैरिज करतेय. फक्त जोडीदार चांगला असायला हवा. तर दुसरीकडे नवरा मुलगा आपल्या बेड वर उदास पडलेला आहे.

या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत रश्मी अणपठ आणि अशोक धागे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर या मलिकेत तृष्णा चंद्रात्रे, प्रगल्भा कोळेकर, प्रदीप डोईफोडे आणि रेशम टिपणीस सुद्धा दिसणार आहे.

आणखी वाचा :

Kanyadaan Serial : कन्यादान मालिकेतील आणखी एक अभिनेता अडकला विवाह बंधनात!

Juna Furniture Box Office Collection : जुनं फर्निचर या चित्रपटाने कमावले तब्बल ईतके पैसे!

Leave a Comment

Exit mobile version