अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या ” पवित्र रिश्ता ” मालिकेची 14 वर्ष !

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या पवित्र रिश्ता मालिकेतिल अर्चना या खास पात्राला आज १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत या मालिकेची १४ वर्षे साजरी केली आहेत. तिच्या आणि सुशांत सिंग रजपूतच्या जोडीला प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली होती.

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही इंडस्ट्री मधली एक प्रतिभावान आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी म्हणून ओळखली जाते. टेलिव्हिजन शोमधील तिच्या एका खास मालिकेला आज १४ वर्षे पूर्ण होत आहे.
पवित्र रिश्ता ही झी टीव्हीवर प्रसारित झालेली मालिका असून 2009 ते 2014 या कालावधीत 5 वर्षे या मालिकेने सगळ्यांची मन जिंकून घेतली.

ही मालिका त्यातली पात्र, कथा या साठी गाजली. अर्चनाच्या भूमिकेत असलेल्या अंकिताच खूप कौतुक देखील झालं तिची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करून केली. तिच्या लीड रोल ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार आणि मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सुवर्ण पुरस्कार या सारखे अनेक पुरस्कार या मालिकेसाठी जिंकले. दिवंगत सुशांत सिंग राजपूतसोबतच्या तिच्या ऑन-स्क्रीन जोडीचे खूप कौतुक झाले. पवित्र रिश्ता लोकप्रिय मागणीमुळे ZEE5 वर पुन्हा प्रदर्शित झाला. या मालिकेला मिळालेला प्रतिसाद अद्भुत होता.

अंकिताने मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटातून झलकारीबाईची खरी भूमिका साकारली होती. तिच्या अलीकडील फीचर फिल्म, आणि द लास्ट कॉफीची प्रेक्षकांनी प्रभावी कामगिरीसाठी प्रशंसा केली. टीव्ही मालिका असो, बॉलीवूड चित्रपट असो किंवा फीचर फिल्म असो, अंकिताने प्रत्येक पात्र उत्तम साकारल आहे.

अंकिता ला प्रत्येक भूमिकेतून प्रेम मिळालं तिच्या चाहत्यांनी तिच्यावर केलेल्या अपार प्रेमाबद्दल ती प्रेक्षकांचे आभार मानते. अंकिता रणदीप हुड्डासोबत स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट करत असून नुकताच याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Leave a Comment

Exit mobile version