अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि रणदीप हुड्डा बहुप्रतिक्षित चित्रपट “स्वातंत्र्य वीर सावरकर” चा टीझर प्रदर्शित !

अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते पण आता ती एका नव्या कोऱ्या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकायला तयार झाली असून तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे कारण तिचा आगामी चित्रपट “स्वातंत्र्य वीर सावरकर” चा बहुप्रतिक्षित टीझर आज प्रदर्शित झाला आहे. उत्कर्ष नैथानी सोबत रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शित आणि सह-लेखन केलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटा साठी रसिकांमध्ये प्रचंड चर्चा आणि उत्सुकता आहे.

“स्वातंत्र्य वीर सावरकर” हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बयोपिक असल्याचं समजतंय.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावशाली व्यक्ती असणाऱ्या सावरकरांचा प्रेरणादायी प्रवास आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्न , त्यांच्या विचारधारा, बलिदान आणि राष्ट्राप्रती अतूट बांधिलकी यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असणार आहे.

आनंद पंडित आणि संदीप सिंग निर्मित, “स्वातंत्र्य वीर सावरकर” ऐतिहासिक कथा प्रेक्षकां पर्यंत पोहचणार आहे. सावरकरांच्या वारशाला श्रद्धांजली अर्पण करणारा आणि प्रेक्षकांना एक अस्सल आणि आकर्षक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.

“स्वातंत्र्य वीर सावरकर” या चित्रपटाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असून संपूर्ण कलाकार आणि क्रू यांचे सूक्ष्म प्रयत्न आणि समर्पण दर्शविते. अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या एक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनेक उत्कृष्ट कलाकार दिसणार असून रणदीप हुडा, जो दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार असून उत्कर्ष नैथानी सह-लेखक आहे.

“स्वातंत्र्य वीर सावरकर” हा चित्रपट आपल्या आकर्षक कथा असलेला आणि ऐतिहासिक चित्रपट आहे. सावरकरांची विलक्षण कथा जिवंत करणे आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे.
टीझर आज प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

“स्वातंत्र्य वीर सावरकर” या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत, उत्कृष्ट कामगिरी आणि कथाकथनाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Leave a Comment

Exit mobile version