अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुलीचा रोका सेरेमनी पार पडला, लवकरच अडकणार विवाहबंधनात!

Title: Alka Kubal Daughter Ishani Athalye’s Roka Ceremony

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री अलका कुबल यांच्या ‘माहेरची साडी’ या सिनेमाला प्रचंड यश मिळाले. त्याचबरोबर त्यांचा नुकताच आलेला ‘धूरळा’ हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. माहेरची साडी या सिनेमातील अलका कुबल यांनी साकारलेली भूमिका तर आजही रसिकांच्या चांगलीच लक्ष्यात आहे. आदर्श सून बनत रुपेरी पडद्यावरची त्यांची एंट्री चांगलीच भाव खाऊन गेली. आता अलका कुबल खऱ्या आयुष्यात सासूबाई बनण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

नुकतीच त्यांची लेक इशानीची रोका सेरेमनी पार पडली. अलका कुबल यांनी कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. अलका कुबल आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन मुली आहेत. यापैकी त्यांची मोठी मुलगी इशानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे. इशानी स्वतः एक पायलट असून २०१५ मध्ये तिला वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं आहे. ती सध्या मियामी, फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे इशानी ज्या निशांतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तो मुळचा दिल्लीचा असून तो देखील मियामीमध्येच वास्तव्यास आहे.

सध्या तरी त्यांची फक्त रोका सेरेमनी झाली असून अजून लग्नाची तारीख निश्चित झाली नसून लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

Alka Kubal Daughter Eashanee Athalye’s Roka Ceremony Photo

Tags: Alka Kubal Daughter Roka Ceremony, Alka Kubal Daughter Ishani Athalye Roka Ceremony, Ishani Athalye Roka Ceremony, Alka Kubal Daughter Wedding, Alka Kubal Daughter Ishani Athalye, Alka Kubal Daughter Marriage, Ishani Athalye Husband

Leave a Comment

Exit mobile version