अग्गंबाई सासुबाई मालिकेतील बबड्या म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की मालिकेच्या प्रवासाबद्दल झाला व्यक्त

झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सासुबाई’ प्रेक्षकांचा निरोप घेत असुन त्याजागी ‘अग्गंबाई सुनबाई’ हे मालिकेच दुसरं पर्व नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . मालिकेतील सोहम म्हणजेच सर्वांचा लाडका बबड्या त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामनात,घराघरात पोहोचला. बबडयाची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्की ह्याने त्याच्या इनस्टाग्राम पेज वरून त्याच्या मनात असलेल्या मालिकेविषयी तसेच त्याच्या मालिकेतील संपूर्ण प्रवासाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आशुतोष म्हणतो की, “सोहम” ऊर्फ “बबड्या”… काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम १नंबर वर असेल माझ्यासाठी, कारण “अग्गंबाई सासूबाई” was a big learning lesson… मराठी भाषेपासून, कलाकाराने camera समोर भावना कशा व्यक्त कराव्यात आणि लोकांच्या मनाचा कसा ठाव घ्यावा हे या मालिकेने शिकवलं… सगळ्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात खूप शिकलो, सगळ्यांनी मला मनापासून सांभाळून घेतलं या साठी I am very gratefull zee marathi आणि आमचे producer sunil bhosale  यांचा मी आभारी आहे की “सोहम” म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला ..आणि तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी सुद्धा खूप प्रेम दिलत.
हे पाहिलं पर्व संपताना सगळा प्रवास आठवतोय… खूप आठवण येईल सगळ्यांची पण “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”… लवकरच एक नवीन चेहरा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करीन तुमच्या मनात घर करण्याचा.. wishing a great success to team “अग्गंबाई सूनबाई” I am sure u all will rock

  अभिनेता आशुतोष पत्की हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे . ‘अग्गंबाई सासुबाई’ ही त्याची पहिलीच मालिका होती. तसेच त्याने काही मराठी चित्रपटांमद्धे देखील काम केलेल आहे.

तर अभिनेता आशुतोष पत्की म्हणजेच सगळ्यांचा लाडका बबड्या याची भूमिका तुम्हांला कशी वाटते ?, आणि त्याचा अभिनय तुम्हांला आवडतो का ? हे आम्हांला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा . 

  

Leave a Comment

Exit mobile version