पिंकीचा विजय असो या मालिकेत आरती मोरे साकारणार पिंकीची भूमिका! शरयू सोनवणे हिने सोडली मालिका.

स्टार प्रवाह वाहिनीवरील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात. बरेच कलाकार काही कारणास्तव मालिका मधूनच सोडतात. मालिकांमध्ये नव्या एंट्री देखील पाहायला मिळतात.

पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने ही मालिका सोडली आहे. शरयूने मालिका का सोडली असेल याचे कारण अजून कळले नाही. दमदार भूमिका साकारणारी पिंकी यापुढून मालिकेत दिसणार नाही. शरयू सोनावणेच्या जागी आपल्याला अभिनेत्री आरती मोरे पिंकीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सरपंच पिंकीच्या डोक्यातून नेहमीच भन्नाट कल्पना येत असतात. प्रत्येक अडचणीच्या वेळेत पिंकी नवा मार्ग काढून, सर्वांची मने जिंकायची. मालिकेत मोठा ट्विस्ट दाखवण्यात आला आहे. पिंकीच्या सासऱ्यांनी नुकताच पिंकीचा अपघात घडवून आणला होता. या संकटातून पिंकी बचावली गेली. हॉस्पिटलमध्ये सध्या पिंकीवर उपचार चालू असून, तिच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. पिंकीचा चेहरा पूर्ण बांधला गेला आहे. तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून एक नवा चेहरा पिंकी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आरतीने यशोदा श्यामची आई या मालिकेत मोठ्या यशोदेची भूमिका साकारली होती. जय मल्हार, अस्मिता, दिल दोस्ती दोबारा, गुलमोहर, कुसुम अशा मालिकांमध्ये काम केले आहे. दादा एक गूड न्यूज आहे या नाटकामध्ये आरती महत्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसली.

तुम्ही पिंकीचा विजय असो या मालिकेत शरयू सोनवणेला पिंकीच्या भूमिकेत मिस कराल का? आरती मोरेला पिंकीच्या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version