अभिनेत्री माधवी गोगटेचे करोनाने निधन

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांच काल दुपारी करोनाने निधन झालय . वयाच्या ५८ व्या वर्षी सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीये.

गेला माधव कुणीकडे, घणचक्कर, बे दुणे चार , प्रियतमा यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केली आहेत. याशिवाय मिसेस तेंडुलकर, ऐसा भी कभी सोचा ना था, एक सफर , बसेरा यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केली आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांना आपण अनुपमा या मालिकेत अनुपमाची आई कांता बेहन च्या भुमिकेत पाहिले होते.

ATOZ marathi कडून माधवी यांना भावपूर्ण श्रद्धांजलि!

Leave a Comment

Exit mobile version