मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग झळकणार करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या आगामी चित्रपटात

झिम्मा, सनी या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री क्षिती जोग आता हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ही मराठमोळी अभिनेत्री करण जोहर दिग्दर्शित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. क्षिती ही एक अतिशय लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. तिने बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

क्षिती तिच्या आगामी चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी या मोठ्या चित्रपटात मोठमोठ्या कलाकारांसोबत सोबत काम करतांना दिसणार आहे. अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री जया बच्चन, अभिनेत्री शबाना आजमी, अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलीया भट्ट हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या कलाकारांसोबत क्षिती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच समोर आला आहे. या मध्ये क्षिती पोस्टर मध्ये झळकत आहे. हा पोस्टर चांगलाच ट्रेंड होत आहे. क्षितीला खुप साऱ्या कलाकारांनी शुभेच्छा देत खुप साऱ्या कमेन्ट केल्या आहेत.

मोठमोठ्या स्टारकास्ट सोबत क्षिती काम करताना म्हटली, अनेक वर्षे रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही खुप मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठही नाही तर आताचे सुपरहिट कलाकार रणवीर सिंग, आलीया भट्ट यांच्या सोबत काम करताना खुप मज्जा आली.

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा येत्या २८ जुलैला सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटला येत आहे. धर्मा प्रॉडक्शनचा हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक खुप उत्सुक आहेत. या सिनेमाचा टीजर अजून रीलीज झालेला नाही.

Leave a Comment

Exit mobile version