अभिनेत्री क्रांति रेडकर हिने पहिल्यांदाच केला पतीसोबतचा फोटो शेयर

अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबतंच तिने त्यांच्यासोबतच एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

समीर वानखेडे हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासुन सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलीवुडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक सेलेब्रिटीवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होतं. बॉलीवुडचं असलेलं ड्रग्स कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं. समीर वानखेडे हे NCB चे विभागीय संचालक आहेत आणि मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे ते पती आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी नुकतीच सोशल मीडिया वर एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबतंच तिने त्यांच्यासोबतचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर यांच्या वाढदिवसानिमित ही खास पोस्ट केली आहे. तिने लिहिलंय, ‘माझ्या विश्वाचं केंद्रबिंदू असलेल्या या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. ज्या व्यक्तीवर मी खूप प्रेम करते आणि त्याचा खूप आदर करते. तुझ्यासाठी माझ्या मनात काय भावना आहेत हे सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तुला माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी मी या विश्वाची फार आभारी आहे. नेहमी खुश राहा. तू ज्या मूल्यांच्या आधारे जीवन जगतोच, तीच तुझी खरी ताकत आहे आणि यासाठी मी तुला सलाम करते’, अशा शब्दांत क्रांतीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यासोबतंच तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओविषयी ती सांगते,’समीर फोटोमद्धे कधीच हसत नाहीत. आम्हा दोघांचे फोटो काढत असताना मी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती आणि अखेर त्यात मी यशस्वी झाले.’ हा व्हिडिओ खरंच मजेशीर आहे.

Tags: Kranti Redkar husband sameer wankhede

Leave a Comment

Exit mobile version