अभिनेत्री कोमल कुंभारने वाढदिवसाविषयी दिली प्रेमाची कबुली! होणारा नवरा करतो हे काम……….

सहकुटुंब सहपरिवार मालिका खुप लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांवर पेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. नुकतेच या मालिकेचे १००० भाग पूर्ण झाले असून, मालिकेचा गोड शेवट देखील होणार आहे. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजी आणि पश्या यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडायची. या मालिकेतील पश्या म्हणजेच आकाश नलावडे खऱ्या आयुष्यात विवाह बंधनात अडकला आहे, हे सर्वानाच माहीत आहे. पण अंजी म्हणजेच कोमल कुंभार अजून अविवाहित आहे. तिच्या प्रेमाविषयी आपल्याला माहीत नव्हते. पण कोमल कुंभारने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. कोमलच्या वाढदिवसाच्या खास celebration आणि डेकोरेशन ची झलक चाहत्यांना सोशल मीडिया वर पाहायला मिळाली आहे.

खास व्यक्तीसोबत बर्थडे celebration कोमलने केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव गोकुळ दशवंत असून तो अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक आहे. गोकुळने केक वर बायको असे देखील लिहिले आहे. गुडघ्यावर बसून गोकुळने कोमलला गुलाब देऊन रिंग देखील घातली आहे. चाहत्यांनी आणि कलाकारांनी कोमल आणि गोकुळ यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. कोमल आणि गोकुळ लवकरच विवाह बंधनात अडकतील, याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

तुम्हाला कोमल आणि गोकुळची जोडी कशी वाटली? सहकुटुंब सहपरिवार मालिका आणि अंजी पश्या यांच्या जोडीला तुम्ही मिस कराल का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version