अभिनेत्री तेजश्री प्रधान ची बॉलीवूड चित्रपटात एन्ट्री! झळकणार या बॉलीवूड अभिनेत्यासोबत

अभिनेत्री तेजश्री प्रधान ची बॉलीवूड चित्रपटात एन्ट्री! झळकणार या बॉलीवूड अभिनेत्यासोबत

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान आता बाॅलिवूड सिनेमात पदार्पण करत आहे. लवकरच ती ‘बबलू बॅचलर’ या आगामी बाॅलिवूड सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. तेजश्रीचा हा पहिलाच बाॅलिवूड चित्रपट आहे. ती प्रथमच अभिनेता शरमन जोशी सोबत अभिनय साकारताना दिसणार आहे.

तेजश्रीने नुकताच तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये तेजश्रीचा नववधूच्या रूपातील सुंदर फोटो समोर आला आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता शरमन जोशीच्या बाजूला अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि दुसर्‍या बाजूला अभिनेत्री पूजा चोपड़ा नववधूच्या रूपात पहायला मिळत आहेत.

या चित्रपटात अभिनेता शरमन जोशी सोबत अभिनेत्री पूजा चोपड़ा, तेजश्री प्रधान आणि अभिनेता राजेश शर्मा हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २० मार्च २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निदेव चटर्जी आहेत तर निर्माते अजय राजधानी आहेत. लखनऊ मध्ये या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे.

Babloo Bachelor Movie Poster

Title: Tejashri Pradhan entry in Bollywood Movie Babloo Bachelor

Tags: Tejashri Pradhan entry in bollywood movie, tejashri pradhan first bollywood movie, tejashri pradhan babloo bachelor movie, tejashri pradhan hindi movie, tejashri pradhan in babloo bachelor movie

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *