अभिनेत्री परी तेलंग विवाह बंधनात अडकली!

अभिनेत्री परी तेलंग विवाह बंधनात अडकली!

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांतून परी तेलंग हे नाव घराघरांत पोहचले आहे. परीने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे. परीने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केल आहे.

तू माझा सांगाती, आभाळमाया, लक्ष्य या मालिकेतून परी घराघरांत पोहचली. फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा, धूम धडाका- कॉमेडीचा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या कॉमेडी शोमध्ये परीने काम केल आहे. Mr&Mrs लांडगे, बाई आमिबा आणि स्टील ग्लास, माझी माय सरसोती या नाटकांमध्ये परीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेत्री परी तेलंग सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. परी तेलंग नुकतीच सिद्धेश शिरगावकर सोबत विवाह बंधनात अडकली आहे. परीने तिच्या लग्नाचे, मेहंदी फंक्शनचे आणि संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. परीच्या मेहंदीच्या फोटोंमध्ये मराठी कलाकार देखील उपस्थित होते. सुकन्या कुलकर्णी, सुलेखा तळवळकर, धनश्री अंतरकर यांचा समावेश दिसतोय.

Title: Actress Pari Telang got married

Tags: Pari Telang Wedding, Pari Telang Marriage, Pari Telang Husband, Pari Telang lagn

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *