संजूचा गाव्हरान ठसका!

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजूचा गाव्हरान ठसका बघायला मिळणार आहे. संजू वेळातवेळ काढून रणजीतला एक छोटसं सरप्राईझ देणार आहे. संजूहा हा हटके अंदाज रणजीतला नक्कीच आवडणार यात शंका नाही. आता संजू रणजीतला काय सरप्राईझ देणार आहे ? नक्की काय घडणार आहे हे मालिकेमध्ये बघा पुढच्या भागामध्ये. संजू असं वेगवेगळ्या पध्दतीच सरप्राईझ रणजीतला देत असते. यावेळेस देखील असाच एक खास प्रयत्न करणार आहे.

शिवानी म्हणाली, “या पध्दतीचा लुक मी पहिल्यांदाच केला आहे शिवानी म्हणून, सेटवर सगळेच उत्सुक होते, त्याकाळातील गाणी लावली होती… त्या वेळेसची गाणी सेटवर लावली जात होती… खरतर हे सरप्राईझ रणजीतसाठी होतं, पण मला या वेगळ्या लुकमध्ये बघून सेटवरचे सगळेच सरप्राईझ झाले होते”.  

Leave a Comment

Exit mobile version