जीव माझा गुंतला या मालिकेत ही नविन अभिनेत्री दिसणार श्वेताच्या भुमिकेत

कलर्स मराठी वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय . यातील सगळ्या पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत. या मालिकेतील श्वेता हे पात्र जरी निगेटिव्ह असल तरी प्रेक्षकांना तिच हे पात्र देखील आवडत आहे. या मालिकेतील श्वेता हे पात्र साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे . ज्यात असं कळतय की ती ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका सोडत आहे. तीने श्वेताच्या भूमिकेतला एक फोटो शेअर करत ”निरोप नाही घेत , फक्त माझा श्वेता शितोळे म्हणून प्रवास इथच थांबतोय. श्वेता शितोळे म्हणून तुम्ही मला खुप प्रेम दिलय थॅंक यू सो मच प्रेक्षकहो . यापुढेही असच प्रेम कराल यात काही शंका नाही . श्वेता शितोळे थॅंक यू . तु खुप काही शिकवल आहेस. तुझे काही अनुभव मला भावी आयुष्यात नक्कीच कामी येतील. भेटू लवकरच .. थॅंक यू. असं कॅप्शन दिले आहे. यावरून ती मालिका सोडत असल्याच कळत आहे.

आता श्वेता ऐवजी कोणती नविन अभिनेत्री येणार हा प्रश्न सगळ्यांनाच आहे तर अभिनेत्री पूर्वा शिंदे यानंतर श्वेताची भूमिका साकारणार आहे. पूर्वाने याआधी ‘लागीर झाल जी’ या मालिकेत जयडीची भूमिका साकारली होती.

तर तुम्ही अभिनेत्री पूर्वा शिंदेला श्वेताच्या भुमिकेत पाहायला उत्सुक आहात का? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version