हे सुप्रसिद्ध कलाकार बिग बॉस ३ मध्ये झळकणार ?

बिग बॉस सीजन ३ येणार अशी घोषणा नुकतीच झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी देखील बिग बॉस सीजन ३ येणार आणि त्यासोबत मी परत येतोय …. तुम्ही तयार रहा …अशी घोषणा केली आणि या कार्यक्रमाच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली. बिग बॉस ३ ची घोषणा झाल्यानंतर आता यात कोणकोणते स्पर्धक असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

तर अभिनेत्री नेहा जोशी आणि संग्राम समेळ हे स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार असल्याची चर्चेची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. यासोबतच अभिनेता संग्राम समेळची पहिली पत्नी अभिनेत्री पल्लवी पाटील ही देखील स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहे. तर अद्याप कलर्स मराठी वाहिनी कडून स्पर्धकांविषयी कोणतीही ठोस बातमी मिळालेली नाही .

तर तुम्हांला हे स्पर्धक बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात पाहायला आवडतील का ? आणि अजुन कोणते स्पर्धक तुम्हांला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडतील हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version