बिग बॉस मराठी सीजन ३ लवकरच येत आहे तुमच्या भेटीला!

मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला ज्या कार्यक्रमाने वेड लावले, ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली असा प्रेक्षकांचा लोकप्रिय टीव्ही रियालिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ मराठी. वादग्रस्त पण तितकाच मनोरंजक असा हा बिग बॉसचा शो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला गेल्या वर्षी आला होता. गेल्या वर्षी शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. या रियालिटी शोला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. बिग बॉसचे दोन्ही पर्व प्रचंड गाजले. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या सोशल मीडियावर “बिग बॉस मराठी”च पोस्टर व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर अंतराळातील थीम दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मराठी “बिग बॉस सीझन ३” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये बिग बॉसचा मंच दिसत असून तिसरा सिझन लवकर सुरु होणार अशी चर्चा सर्वत्र आहे. या पर्वामध्ये कोणते नवीन स्पर्धक असणार याचीही उत्सुकता सर्वांनाच आहे.

मात्र अद्यापतरी कलर्स मराठीकडून तिसऱ्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नक्की हे पर्व कधी सुरु होणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावीच लागेल.

Title: Bigg Boss Marathi Season 3 comming soon

Tags: Bigg Boss Marathi 3, Bigg Boss Marathi Season 3 comming soon, Bigg boss Marathi 3 latest update, Bigg Boss marathi 3 Start date, Bigg Boss Marathi 3 Contestants, Marathi Bigg Boss 3

Leave a Comment

Exit mobile version