बिग बॉस मराठी फेम पराग कान्हेरे विवाहबंधनात अडकला

बिग बॉस मराठी’ सीझन २ मधील स्पर्धक शेफ पराग कान्हेरे नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. परागचे बिग बॉसच्या घरात असताना परागने रुपालीसाठी असलेलं प्रेम व्यक्त केलं होत. पराग आणि रुपाली भोसले यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. परंतू रुपारीनं कधीही या गोष्टीला दुजोरा दिला नाही. हा शो संपताच या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला.

त्यानंतर पराग पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा सर्वत्र होती. गेल्या काही दिवसांपासून पराग कान्हेरे आणि मुक्ता भातखंडे एकमेकांना डेट करत होते आणि लवकरच ते विवाह बंधनात आडकणार असल्याचे परागने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते.

नुकताच परागने मुक्ता भातखंडे सोबत लग्न केल्याची बातमी सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांसहशेअर केली आहे. परागने त्याच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमातील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांच्या हळदी आणि मेहेंदी समारंभातील फोटो देखील शेअर केले आहेत. या दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यातील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छां!

Title: Bigg Boss Marathi Season 2 Contestant Parag Kanhere get married

Parag Kanhere Wedding Photos

Tags: Parag Kanhere Wedding, Parag Kanhere Marriage, Parag Kanhere Wife

Leave a Comment

Exit mobile version