मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे जानकी 'रणदिवे’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून सुमित पुसावळे दिसणार आहे.

जानकी रणदिवे म्हणजेच रेश्माच्या ऑनस्क्रीन लेकीच्या भूमिकेत बालकलाकार आरोही सांबरे झळकणार आहे.

अभिनेत्री सविता प्रभुणे या मालिकेत जानकीच्या सासूबाईंची भूमिका साकारणार आहेत.

मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर देखील या नवीन मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारेल.

‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे अभिनेता आशुतोष पत्की घराघरांत लोकप्रिय झाला होता. तो आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेत सौमित्र हे पात्र साकारणार आहे.