तुझ्यात जीव रंगला मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

तुझ्यात जीव रंगला मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

गेल्या वर्षभरात करोनाच्या प्रादुर्भावाने टेलिव्हिजंन क्षेत्रात अनेक चढउतार झालेले पाहायला मिळाले. काही महिने मालिकेंच शूटिंग देखील बंद होते. तर मालिकेमद्धे थोड्या फार प्रमाणात बदल देखील झाले.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका जवळ जवळ ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होती. ३ ऑक्टोबर २०१६ ला सुरू झालेली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तुझ्यात जीव रंगला ह्या मालिकेला गेल्या ४ वर्षात भरभरून प्रेम मिळालं. ह्या मालिकेने नेहमीच TRP मध्ये सातत्य ठेवल.

तसेच झी मराठी वर नवीन मालिकेचा प्रोमो आपण पाहिला. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका ४ जानेवारी पासुन रात्री ८ वाजता असल्यामुळे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बंद होणार अश्या चर्चा सध्या चालु होत्या परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ह्या मालिकेच्या वेळेत आता बदल होणार आहे आणि तुझ्यात जीव रंगला मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Tags: Tuzyat Jiv Rangala end, Tuzyat jiv rangala off air, tuzyat jiv rangala band

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *