सध्या आपल्याला कोणी ना कोणी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतेच राजा रानीची गं जोडी मालिकेतील दादासाहेब खऱ्या आयुष्यात देखील विवाह बंधनात अडकले आहेत. दादा साहेब यांचं खरं नाव शैलेश कोरडे असून त्यांनी श्रुती कुलकर्णी यांच्याशी लग्न केले आहे. श्रुती देखील मराठी कलाक्षेत्रात सक्रिय आहे. त्यांनी विविध नाटक आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये कामं केली आहेत.
नुकतेच शैलेश आणि श्रुती यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोसिअल मीडिया वर पोस्ट करत म्हंटल अणे कि “अचानक निर्णय झाल्यामुळे आणि कोविडच्या निर्बंधामुळे कमी मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. तरी आपण सर्वांचे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहेत अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.”
त्यांच्या लग्नाच्या या फोटोखाली शिवानी आणि मणिराजने देखील कंमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर तुम्हाला शैलेश आणि श्रुती यांची जोडी आवडली का ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.