लग्नाची वाईफ वेडिंगची बायको मालिकेचे १०० भाग पूर्ण, कलाकारांनी केक कापून केलं सेलेब्रेशन!

लग्नाची वाईफ वेडिंगची बायको मालिकेचे १०० भाग पूर्ण, कलाकारांनी केक कापून केलं सेलेब्रेशन!

झी मराठी वाहिनीवरील ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. या आठवड्यातील टीआरपी लिस्टमध्ये टॉप 5 या झी मराठीच्याच मालिका आहेत. या लिस्टमध्ये ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ मालिकाच्या रेटिंगमध्ये वाढ झाली असून ही मालिका आता तिसऱ्या स्थानावर आहे.

लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या लोकप्रिय मालिकेनं नुकताच १०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. याच निमित्ताने लग्नाची वाईफ वेडिंगची बायको मालिकेतील सर्व कलाकारांनी सेटवर केक कापून सेलेब्रेशन केले आहे. या मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. उत्तम कथानक, कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेने काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली.

या मालिकेमध्ये अभिनेता विजय आंदळकरने मदन ही प्रमुख भूमिका साकारली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री लियाना आनंद मारिया आणि अभिनेत्री रुपाली झंकार काजोल ही प्रमुख भूमिका साकारत आहे. सध्या या मालिकेत दोन सवतीमधील स्पर्धा आणि त्यामुळे मदनची उडणारी तारांबळ पाहायला मिळत आहे. पण तरीही मदन चतुरीनं या दोघींनाही सांभळताना दिसत आहे. या मालिकेमधील इतर पात्रे देखील या कार्यक्रमाची रंगत वाढवत आहेत.

Title: Lagnachi Wife Weddingchi Baykoo serial 100 episodes celebration

Lagnachi Wife Weddingchi Baykoo serial 100 episodes celebration

Tags: Lagnachi Wife Weddingchi Baykoo 100 episodes celebration

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *