कन्यादान मालिकेतील ऑनस्क्रीन कपलचा साखरपुडा संपन्न! मालिकेच्या सेटवर झालं प्रेम.

कन्यादान मालिकेतील ऑनस्क्रीन कपलचा साखरपुडा संपन्न! मालिकेच्या सेटवर झालं प्रेम.

मराठी मनोरंजनविश्वात बरेच कपल विवाह बंधनात अडकताना दिसले आहे. काही जणांनी साखरपुडा देखील उरकला आहे. काही दिवसांपूर्वी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा विवाह झाला आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशीष कुलकर्णी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. तसेच अभिनेत्री पूजा सावंतने देखील गुपचुप साखरपुडा उरकला आहे. आता आणखी एक ऑनस्क्रीन जोडी लग्न बंधनात अडकणार आहे.

सन मराठीवरील कन्यादान मालिकेतील ऑनस्क्रीन कपल वृंदा- राणा म्हणजेच अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी साखरपुडा केलाय. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. अमृता आणि शुभंकर यांचा साखरपुडा संपन्न झाला असून, चाहत्यांनी आणि कलाकारांनी या सुंदर कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृताने हिरव्या रंगाची साडी तर शुभंकरने फिक्कट हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

कन्यादान मालिकेच्या सेटवर अमृता आणि शुभंकर यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या मालिकेत अमृताने वृंदा तर शुभंकरने राणा हे पात्र साकारले आहे. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

तुम्हाला अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांची जोडी आवडली का? तुम्ही अमृता आणि शुभंकरच्या लग्नासाठी उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Shamshad Sayyad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *