काव्यांजली सखी सावली मालिकेतून प्रसाद जवादेची एक्झिट! अभिनेता आदिश वैद्य साकारणार प्रीतमची भूमिका.

काव्यांजली सखी सावली मालिकेतून प्रसाद जवादेची  एक्झिट! अभिनेता आदिश वैद्य साकारणार प्रीतमची भूमिका.

काव्यांजली सखी सावली मालिका अवघ्या कमी वेळेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रं प्रेक्षकांची आवडती आहेत. प्रीतम या पात्राला प्रेक्षक खुप पसंत करतात. प्रीतमची भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारतोय. प्रसादची काव्यांजली सखी सावली ही मालिका सर्वांची आवडती मालिका आहे. पण ही मालिका प्रसादने सोडली आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. आता प्रीतमची भूमिका अभिनेता आदिश वैद्य साकारणार आहे.

आतापर्यंत आपण प्रसादला प्रीतमच्या भूमिकेत पाहत होतो. आता आदिश वैद्यला पाहणार आहोत. प्रसादने ही मालिका का सोडली असेल याचे कारण अद्याप कळले नाही. प्रसादचे लग्न अभिनेत्री अमृता देशमुख सोबत येत्या १८ नोव्हेंबरला आहे. लग्नाच्या तयारी साठी प्रसादने मालिका सोडली असावी, अशी देखील शक्यता आहे.

आदिशने कुंकू टिकली आणि टॅटू, गणपती बाप्पा मोरया या मराठी मालिकांमध्ये काम केले असून, त्याने मराठी सिनेमामध्ये देखील काम केले आहे. गुम है किसी प्यार मे, बॅरिस्टर बाबू, पुष्पा इम्पॉसिबल आणि सावी की सवारी अशा हिंदी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

तुम्ही प्रसादला काव्यांजली सखी सावली मालिकेत प्रीतमच्या भूमिकेत मिस कराल का? तुम्ही आदिश वैद्यला प्रीतमच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Shamshad Sayyad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *