स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत लवकरच आपल्याला अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील अरुंधतीचा लहान मुलगा यश प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारत आहे. या मालिकेत आपल्याला यशचे गौरीवर खूप प्रेम आहे हे दिसून येते. परंतु रीयल लाइफ मध्ये यश कोणावर प्रेम करतो आणि त्याच्या आयुष्यातील कोण आहे ती लकी गर्ल हेच आज आपण पाहणार आहोत.
अभिनेता अभिषेक देशमुख याचे लग्न सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कृतिका देव हिच्यासोबत 6 जानेवारी 2018 रोजी झालं आहे. त्यांच्या लग्नाला आत्ता 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिषेक आणि कृतिका यांचा हा प्रेमविवाह झाला आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला होता. यावेळी अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईकच लग्नाला उपस्थित होते.
अभिनेत्री कृतिका देव ही मुळची पुण्याची. तिने आपले शालेय शिक्षण एस पी कॉलेज मधून पूर्ण केले आहे. Prime Time मालिकेत तिने काव्या आपटेची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने राजवाडे अँड सन्स, हॅप्पी Journey, हवाईजादा, बकेट लिस्ट, पानिपत यांसारख्या चित्रपटांत देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
अभिषेक देखील एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याने पसंत आहे मुलगी या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. आत्ता तो आई कुठे काय करते या मालिकेत आईचा लाडका मुलगा यशची भूमिका साकारत आहे.
Abhishek Deshmukh real life wife, abhishek deshmukh girlfriend