राणा अंजलीच्या साखरपुड्याला लावली कलाकारांनी हजेरी…

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील आवडती जोडी म्हणजे राणा आणि अंजली या दोघांनीही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. अगदी थाटामाटात हा साखरपुडा संपन्न झाला. हार्दिक आणि अक्षया हे दोघेही खुपच सुंदर दिसत होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यांच्या साखरपुड्याला त्यांच्या मालिकेतील सहकलाकार देखील उपस्थित होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील वाहिणीसाहेब,बरकत,तसेच इतरही कलाकार हजर होते. तसेच हार्दिक सध्या झी मराठी वरील ‘तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. त्यातील अमृता पवार  ,वीणा जगताप आदी कलाकार हजर होते.

तर तुम्हांला हार्दिक आणि अक्षयाची जोडी कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा.

Leave a Comment