आशुतोषच्या आठवणीत मयूरी झाली भावुक, केकचा फोटो केला शेयर!

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयूरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे याने नांदेड मधील राहत्या घरी २९ जुलै २०२० रोजी गळफास घेऊन आपल जीवन संपवल. आशुतोष ने अचानक उचलेल्या या पावलांमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आशुतोषचा ११ ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो. त्यामुळे मयूरी देखील घरच्या घरी केक कसा बनवायचा याचे धडे घेत होती. परंतु मयूरी ला काय माहीत की आशुतोष आपल्याला वाढदिवसाच्या आधीच सोडून जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेत्री मयूरी देशमुख हिने स्वताला या धक्क्यातून सावरत सोशल मीडिया वर आशुतोषच्या वाढदिवसाचा केक पोस्ट केला आहे. त्यावर आशु अस लिहिल गेलं आहे. मयूरीने पोस्ट खाली खूप मोठे Caption लिहिले आहे. यात तिने लिहिले आहे की “आशुदा, मी या लॉक डाऊनमध्ये तुझ्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारचे ३० केक बनवले. तू प्रत्येक केकचा पहिला बाइट घेतला परंतु या केकच काय? तूला तुझे पुढचे ३० वाढदिवस advance मध्ये साजरे करायचे होते का? तुझ्या प्रियजणांच्या मनातले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

शेवटी तिने या caption मध्ये लिहिले आहे की Happy Birthday!!! Yours Truly, #baykotujhinawasachi

या पोस्टवर कमेन्ट करत काही मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला आपण दुखात सहभागी असल्याच सांगत तिला धीर देण्याच काम केलं आहे. मयूरीच्या या पोस्टमुळे सर्वजण भावुक झाले आहेत. आशुतोष भाकरे याच्या आत्म्याला चिरशांति लाभो हीच atoz मराठी टीमकडून कडून ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.

https://www.instagram.com/p/CDwNHRmgcJo/

Tags: Mayuri Deshmukh Shared Birthday Cake photo for Ashutosh Bhakre, Mayuri Deshmukh Husband News, Ashutosh Bhakre news, Mayuri Deshmukh First Reaction, Mayuri Deshmukh News in Marathi, Ashutosh Bhakre news in Marathi

Leave a Comment