स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होऊन माझा होशील ना नवीन मालिका येणार!

झी मराठी वाहिनी कायमच आपल्या प्रेक्षकांसाठी नव नवीन मालिका प्रसारित करत असते. झी मराठीवर नुकतंच ‘माझा होशील ना’ या नव्या मालिकेचे प्रोमो प्रसारित होण्यास सुरु झाले असून सोशल मीडियावर देखील या मालिकेचे प्रोमो व्हायरल होत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लवकरच झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा शेवटचा भाग पार पडणार आहे. आता या मालिकेच्या जागी झी मराठीवर रात्री 9:00 ते 9:30 वाजता ‘माझा होशील ना’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर दाखविण्यात आलेल्या या मालिकेच्या प्रोमो वरून तर ही एक लव्हस्टोरी असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री गौतमी देशपांडे ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहिण आहे.

याचबरोबर या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे, विनय येडेकर, अच्युत पोतदार आणि निखिल रत्नपारखी हे देखील अभिनय साकारताना दिसणार आहेत.

Title: Maza Hoshil Na New Serial

https://www.instagram.com/p/B8bzgiSHtbz/?igshid=yi2r2ten8ovo

Tags: Maza Hoshil Na, Maza Hoshil Na Cast, Maza Hoshil Na new serial, Maza Hoshil Na Serial

Leave a Comment