जागो मोहन प्यारे फेम दिशा दानडे लग्नबंधनात अडकली!

झी मराठी वाहिनीवरील ‘जागो मोहन प्यारे’ या गाजलेल्या मालिकेत अंजली ही भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजेच खऱ्या आयुष्यातील ‘दिशा दानडे’ नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. दिशाने गुण्यागोविंदाने, फुलराणी या नाटकांमध्ये काम केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दिशा दानडे ने तिचा मित्र सुहास लखन सोबत लग्न केले आहे. अगदी थाटामाटात त्यांचा विवाह सोहोळा पार पडला. सुहास हा मराठी कलाविश्वातील एक उत्तम अभिनेता आहे. दिशा आणि सुहास ने ‘ब्लॅक आउट’ या नाटकात एकत्र काम केले आहे. याशिवाय काही मोजक्या मराठी चित्रपटातून सुहासने छोट्या मोठ्या भूमिका देखील साकारल्या आहेत. अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं देखील मिळवली आहेत.

दिशाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. दिशाच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या दिशाच्या विवाहसोहळ्याला अनेक मित्र मंडळींसोबत अभिनेत्री नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे, श्रुती मराठे, अभिजित खांडकेकर, हेमांगी कवी या कलाकारांनी हजेरी लावली होती.

लग्नानंतरच्या रिसेप्शन सोहळ्यात दिशा आणि सुहास दोघेही फुलांनी सजवलेल्या बुलेटवर स्वार होऊन दाखल झाले होते. या दोघांनाही त्यांच्या आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

Title: Jago Mohan Pyare fame actress Disha Danade got married

Disha Danade Wedding Photo

Tags: Disha Danade, Disha Danade Marriage, Disha Dahande Wedding, Disha Danade Lagn, Jago Mohan Pyare fame Disha Danade Marriage, Disha Danade husband

Leave a Comment