पहा अभिनेता सुमित पुसावळे घरी बसून काय करत आहे?

सध्या भारतात महामारी पसरली असून सर्व शहरं बंद आहेत. उद्योगधंदे, बांधकाम, वाहतूक सर्व काही बंद आहे. त्यातच तुम्ही घरी बसून ज्या मालिका पाहता त्यांचं शूटिंग देखील बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे आत्ता सर्व मालिका बंद आहेत. सर्व वाहिन्या आपल्या जुन्या मालिका आणि शो पुन्हा प्रसारित करत आहेत.

मालिका बंद असल्यामुळे मालिकेतील कलाकार आत्ता काय करत असतील याची उत्सुकता सर्व रसिक प्रेक्षकांमध्ये आहे. काही कलाकार आपल्या गावी गेले असून शेतात काम करत आहेत तर काही जण आपल्या घरी राहून स्वयंपाक आणि डान्स शिकत आहेत आणि आपल्या फॅमिली बरोबर वेळ घालवत आहेत.

कलर्स मराठी वाहिनीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. परंतु भारतात पसरलेल्या महामारीमुळे या मालिकेचे शूटिंग देखील बंद करण्यात आले आहे. या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे बाळूमामा यांची भूमिका साकारत असून अभिनेत्री कोमल मोरे बाळुमामाची पत्नी सत्यवा ची भूमिका साकारत आहे.

बाळुमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळे मालिकेचे शूटिंग बंद झाल्यामुळे आपल्या गावी गेला आहे. गावात त्याचं संपूर्ण कुटुंब राहत असून तो देखील आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सुमित हा शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्यामुळे तो आपल्या शेतात काम करतानाचे फोटो  सोसिअल मीडिया वर टाकत असतो.

सुमितने आपल्या शेतात चिकूच्या झाडावर चढून चिकू तोडतानाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत तसेच तो शेतातील जनावरांना चारापाणी देखील देत आहे. घरी बसल्या सुमितने आपल्या कुटुंबासोबत जात्यावर दळण दळतानाचा विडिओ देखील शेअर केला आहे. अभिनेता सुमित पुसावळे याला खूपच लोकप्रियता मिळत आहे तरीदेखील आपले पाय जमिनीवरच आहेत हे याच एक उत्तम उदाहरण.

Sumeet Pusavale Quarantine Time Work

Tags: Sumeet Pusavale Quarantine Work, Sumit Pusavale Quarantine Work, Balumamachya Navan Changbhal fame Sumeet Pusavale Quarantine Work

Leave a Comment

Exit mobile version