अभिनेत्री आणि गायिका प्रियंका बर्वे हिला पुत्ररत्न

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गायिका प्रियंका बर्वे हिच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ही बातमी प्रियंका आणि तिचा नवरा सारंग कुलकर्णी यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंका आणि सारंग यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून आपण लवकरच आई बाबा होणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांनी सोशल मीडिया वर प्रियंका बर्वे हिने बेबी बंप सहित काही फोटो पोस्ट केले होते.

20 ऑगस्ट 2020 रोजी त्यांना एक मुलगा झाला आहे. त्याचे नाव प्रियंकाने युवान असे ठेवले आहे. सोशल मीडिया वर त्यांनी आपल्या बाळसहित फोटो पोस्ट केला आहे. प्रियंका आणि सारंग या फोटो मध्ये खूपच खुश दिसत आहेत.

हा फोटो पोस्ट करताना प्रियंकाने लिहिले आहे की “ आमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आनंद शेयर करत आहे. 20 ऑगस्ट 2020 रोजी सारंग आणि मला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव युवान सारंग कुलकर्णी ठेवले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच राहू द्या.”

प्रियंका बर्वे ही मराठी कला विश्वातील एक नावाजलेले अभिनेत्री आणि गायिका आहे. लग्न झाल्यापासून ती तिच्या नवऱ्यासोबत quality time spend करत आहे. प्रियंका आणि सारंग यांची केमिस्ट्री खूपच छान आहे. प्रियंकाने आनंदी गोपाल, डबल सीट, रमा माधव यांसारख्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.  

Tags : priyanka barve blessed with a baby boy, priyanka barve kids, priyanka barve and sarang kulkarni blessed with a baby boy

Leave a Comment

Exit mobile version