अभिनेत्री प्रसिद्धी किशोर लवकरच विवाहबंधनात अडकणार.

स्टार प्रवाह वरील नकुशी या मालिकेत अभिनेते उपेद्र लिमये यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री प्रसिद्धी किशोर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे . तिने तिच्या इनस्टाग्राम हॅंडल वर तिचा आणि तिच्या होणाऱ्या पतीचा फोटो पोस्ट करत एक नवी सुरवात अस कॅप्शन त्याला दिलय . यावरून अभिनेत्री प्रसिद्धी किशोर ही लवकरच लग्न करणार असल्याच कळत आहे.तिच्या या पोस्टवर तिच्या कलाकार मित्र मैत्रिणींनी देखील तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव ओमकार वर्तक असे आहे.

अभिनेत्री प्रसिद्धी किशोर हिला आपण नकुशी या मालिकेत नकुशीच पात्र साकारताना पहिले होते. यानंतर ‘ आम्ही दोघी’ यामालिकेत देखील प्रसिद्धी दिसून आली. त्यासोबतच तिने काही अल्बम सॉन्ग आणि प्रसिद्ध नाटकांमध्ये देखील कामं केली आहेत.

Leave a Comment

Exit mobile version