मिसेस मुख्यमंत्री मालिकेचे २०० भाग पूर्ण, कलाकारांनी असे केले सेलेब्रेशन!

मिसेस मुख्यमंत्री मालिकेचे २०० भाग पूर्ण, कलाकारांनी असे केले सेलेब्रेशन!

झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय मालिकेनं नुकताच यशस्वीरीत्या २०० भागांचा टप्पा पार केला आहे. याच निमित्ताने मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सर्व कलाकारांनी सेटवर केक कापून सेलेब्रेशन केले आहे.

सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. उत्तम कथानक, कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेने काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली.

सुमीचा बिनधास्त आणि रोखठोक स्वभाव प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. मालिकेतील सुमीचं पात्र लोकांना प्रचंड आवडलं आहे. या मालिकेमधील समर आणि सुमी ची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असून ब-याच जणांना ही मालिका आपल्या जवळची वाटू लागली आहे. अल्पावधीतच सुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने रसिकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केल आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून अमृताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमधील इतर पात्रे बबन, तात्या, मामी साहेब, लक्ष्मण हे देखील या कार्यक्रमाची रंगत वाढवत आहेत. तर दुसरीकडे ताईसाहेब आणि मामांची कटकारस्थाने देखील मालिकेत बरीच ट्विस्ट आणत आहेत.

Title: Mrs Mukhyamantri serial 200 episodes celebration

Tags: Mrs mukhyamantri 200 episodes celebration, mrs mukhyamantri serial 200 episodes celebration party, mises mukhyamantri serial 200 episodes

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *