उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अजित पवार यांना ताप आणि कणकण असल्याने ते घरीच विश्रांती घेत होते. आत्ता ते करोना पॉजिटिव असल्याचे समोर आले आहे.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *