अभिनेत्री राधा सागरच्या मुलाचे पार पडले बारशे ! नाव आहे खूपच सुंदर.

अभिनेत्री राधा सागरच्या मुलाचे पार पडले बारशे ! नाव आहे खूपच सुंदर.

अभिनेत्री राधा सागर तिच्या अभिनयामुळे ओळखली जात आहे. तिच्या उत्तम अभिनयातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राधा सागरने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, तो आता २ महिन्यांचा आहे. राधा सागरने तिच्या मुलाचे नाव ठेवले आहे. नुकतेच तिच्या मुलाचे बारसे पार पडले असून, त्याचे नाव वीर असे आहे. बाळाचं बारसं खुप थाटामाटात पार पडले आहे. राधाने बारश्याचे सुंदर असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राधाच्या मुलाच्या बारशाला तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रीणी यांनी हजेरी लावली होती. राधाने तिच्या मुलासोबत ट्विनिंग केल्याचे आपल्याला फोटोमध्ये दिसत आहे. राधाने पैठणीचा जांभळ्या रंगाचा सुंदर अस गाऊन ड्रेस परिधान केला असून, तिच्या मुलाला देखील तशाच प्रकारचा सुंदर ड्रेस घालण्यात आला आहे. आई आणि मुलाच्या ट्विनिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

राधाचे चाहते बाळाचे नाव जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक होते. राधाने वीर असे नाव ठेवले असून नावाचा अर्थ देखील खुप चांगला आहे. राधाने सध्या करियरमधून ब्रेक घेतला असून, ती आता वीरला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे.

तुम्हाला राधा सागरच्या मुलाच्या बारशाचे फोटो आवडले का? तुम्हाला तिच्या मुलाचे वीर नाव आवडले का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Shamshad Sayyad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *