अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खूशबू तावडे हे रीयल लाइफ कपल लवकरच होणार आई बाबा

‘देवयानी’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता संग्राम साळवी आणि अनेक मालिकेंमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री खुशबू तावडे या रीयल लाइफ जोडीने नुकतीच एक आनंदाची गोड बातमी चाहत्यांनसोबत शेअर केली आहे. खुशबूच्या वाढदिवसाच निमित्त साधत ते दोघे आई बाबा होणार असल्याची गोड बातमी दोघांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

संग्रामने दोघांचा गोंडस फोटो शेअर करत हॅप्पी बर्थडे मॉम टू बी . आता लवकरच तुला त्रास देणारा मी एकटा नसणार आहे . माझ्या पार्टनर इन क्राइमची मी आतुरतेने वाट पाहतोय . लव यू खूशबू . असे क्यूट कॅप्शन त्याने दिले आहे. तसेच खूशबूने बेबी बम्पसह फोटो टाकत आम्ही आमच्या कुटुंबात थोड आणखीन प्रेम वाढवत आहोत . लव यू संग्राम . असं कॅप्शन तिने दिले आहे. या दोघांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी मित्र मैत्रिणींंनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच अभिनेत्री तितीक्षा तावडे म्हणजेच खूशबू तावडेची धाकटी बहीण तीने देखील दोघींचा फोटो शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे.

A to Z मराठी कडून अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खूशबू तावडे या दोघांचे खुप खुप अभिनंदन .

Leave a Comment

Exit mobile version