रंग माझा वेगळा मालिकेनंतर हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत झळकणार सन मराठीवरील या मालिकेत!

रंग माझा वेगळा मालिकेनंतर हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत झळकणार सन  मराठीवरील या मालिकेत!

अभिनेत्री हर्षदा खानविलकर त्यांच्या उत्तम अभिनयामुळे ओळखल्या जातात. त्यांच्या सर्वच मालिका गाजलेल्या आहेत. पुढचं पाऊल मालिकेतील अक्कासाहेब , रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदार या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. तसेच सुख म्हणजे नक्की काय मालिकेत त्या सरपंच वसुंधरा देवी नावाची भूमिका साकारताना दिसत आहेत. या पात्राला देखील प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.

हर्षदा खानविलकर आता सन मराठीवरील नव्या कोऱ्या मालिकेत झळकणार आहेत. सन मराठीवरील ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेचे नाव मुलगी पसंत आहे असे आहे. मालिका कधी सुरू होणार आहे, हे अद्याप कळले नाही. प्रोमो पाहता मालिका खूपच छान आहे. या मालिकेत त्यांच्यासोबत अभिनेता संग्राम समेळ, तसेच अभिनेत्री कल्याणी टिभे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अभिनेत्री हर्षदा खानविलकर संग्राम समेळच्या आईची भूमिका साकारणार आहे. याअगोदर संग्राम आणि हर्षदा खानविलकर यांनी पुढचं पाऊल या मालिकेत काम केले होते.

तर संग्राम समेळ, हर्षदा खानविलकर आणि कल्याणी टिभे मनोरंजन करायला येत आहेत, लवकरच एका नव्या कोऱ्या मालिकेसह आपल्या सन मराठीवर. तुम्ही मुलगी पसंत आहे मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Shamshad Sayyad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *