सध्याच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात मालिकेंच शुटींग करणं शक्य नाही त्यामुळेच झी मराठी वरील मालिकांच शुटींग देखील दुसऱ्या राज्यात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर या व्हिडिओ द्वारे आपण पाहणार आहोत झी मराठी वाहिनी वरील मालिकेंच नविन शुटींग लोकेशन.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच शुटींग गुजरात मधील दमन येथे होणार आहे. अग्गंबाई सुनबाई आणि पहिले न मी तुला या मालिकेंच शुटींग होणार आहे ते गोव्यामद्धे. तर माझा होशील ना या मालिकेच शुटींग हे सिल्वासा येथे होणार आहे. त्याचबरोबर देवमाणूस या मालिकेच शुटींग होणार आहे ते बेळगाव येथे आणि चला हवा येउद्याच शुटींग होणार जयपूर येथे. तर अशा प्रकारे या सर्व मालिकेंचे शुटींग दुसऱ्या राज्यात हलवण्यात आले आहेत आणि सर्व मालिकेतील कलाकार आता ठरलेल्या लोकेशन च्या ठिकाणी रवाना झाले आहेत.
‘पहिले न मी तुला’ या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या प्रवासातील काही फोटो शेअर केले आहेत . तर अग्गंबाई सुनबाई या मालिकेतील कलाकार देखील गोव्या ला पोहोचले आहेत आणि त्यातील सोहम ने DDLJ या चित्रपटातील सीन सारखा एक मजेशीर व्हिडिओ बनवला आहे.
तर झी मराठी वरील कोणती मालिका तुम्हांला जास्त आवडते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा .