झी मराठी वाहिनी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना आवडतायत . पण एका पात्राचा मात्र प्रेक्षकांना फार राग येतोय . पैशांचा माज असणारी ,घमेंडी, सतत इतरांचा अपमान करणारी अशी मालविका दाखवण्यात आली आहे . तर दुसरीकडे ओम आणि स्वीटूच्या प्रेमाची गाडी पुढे न्यायला मदत करणारा रॉकी . ,मालविकाने केलेला अपमान सहन करणारा , तिच्या तालावर नाचणारा असा रॉकी .
आज आपण ह्या व्हिडिओ द्वारे जाणून घेणार आहोत मालविका म्हणजेच अभिनेत्री अदिती सारंगधर आणि रॉकी म्हणजेच अभिनेता त्रियुग मंत्री बद्दल.
आदितीचा जन्म १६ ऑक्टोंबर १९८१ ला झाला. तिने रुईया कॉलेजमधून तिच ग्रॅजुएशन पुर्ण केलय. आदितीने ग्रेसफुल, प्रपोसल, ऑल द बेस्ट यांसारख्या नाटकांमद्धे काम केले आहे. तर ‘वादळवाट’ या मालिकेद्वारे तिने टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केल . या मालिकेत तिने रमाची भूमिका साकारली होती. त्यानंतर स्टार प्रवाह वरील ‘लक्ष्य’ या मालिकेत इंस्पेक्टर सलोनी हे पात्र साकारल होत. तर ह. म बने ,तु. म बने या मालिकेत देखील आदितीने काम केले आहे. स्वराज्य रक्षक जिजामाता सारखी मालिका आणि ढोलकीच्या तालावर सारखा रीयालिटि शो मद्धे देखील आदिती दिसून आली. मोहर , मंडळी तुमच्यासाठी कायपण , आकांत , सूत्रधार , नवरा माझा भवरा , तूच खरी घरची लक्ष्मी, नाथा पुरे आता, होऊ दे जरासा उशीर , यांसारख्या अनेक चित्रपटांमद्धे तिने काम केले आहे.
आदितीच्या नवऱ्याचे नाव सुहास रेवंडेकर असे असुन त्याच लग्न २५ मे २०१३ ला झालं आहे. त्यांना एक अरीन नावाचा लहान मुलगा आहे. आणि आता आपण आदितीला ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मालविका साकारताना पाहत आहोत.
तर रॉकीचे खरे नाव आहे त्रियुग मंत्री . त्रियुगचा जन्म ११ डिसेंबर १९८५ ला मुंबई येथे झाला आहे. त्याने त्याच ग्रॅजुएशन हे युनिवर्सिटी ऑफ मुंबई कॉलेज मधुन पुर्ण केलय. त्याने २०१३ मधील भारत के वीर पुत्र महाराणा प्रताप या हिंदी मालिकेतून या टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केल. तसेच २०१० मध्ये payback या चित्रपटात देखील त्याने काम केल आहे. आणि आता तो झी मराठी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत रॉकीचे पात्र साकारत आहे. त्रियुगच्या बायकोचे नाव हितिक्षा मंत्री असे आहे.
तर तुम्हांला रॉकी आणि मालविकाचा अभिनय कसा वाटतो हे आम्हांला कॉमेंट्स करून नक्की सांगा .