सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यातील स्वीटू आणि ओम सोबतच सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत . सर्वच कलाकार उत्तमरित्या आपापल्या भूमिका निभवत आहेत.
पण आज आपण जाणून घेणार आहोत स्वीटू ची आई नलू, म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर बद्दल .
अभिनेत्री दीप्ती केतकर हिचा जन्म १६ एप्रिल १९८१ रोजी मुंबई येथे झाला . दीप्ती केतकर ही अभिनेत्री तसेच उत्तम डान्सर देखील आहे. तिचं शालेय शिक्षण हे सेंट थॉमस ,गोरेगांव ह्या शाळेत झालं असुन तिचं महाविद्यालईन शिक्षण हे नालंदा नृत्य कला महाविद्यालयात झालेल आहे . तिने तिच्या अभिनय करियर ची सुरवात ही मालिकांपासून केली, त्यात मनुष्यदेवता ही तिची पहिलीचं मालिका . त्यानंतर तिने दामिनी , अवघाची संसार , कुंकू , मला सासु हवी , कमला , भागो मोहन प्यारे अशा अनेक मालिकेंमध्ये तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे .
मालिकेंसोबतच तिने मराठी चित्रपटांमध्येही कामं केलेली आहेत. त्यात भक्ति हीच खरी शक्ति , रंगराव चौधरी , सनई चौघडे ,बळिराजचं राज्य येऊदे अशा मराठी चित्रपटांमद्धे ही तिने कामं केली आहेत . मालिका , चित्रपट याबरोबरच दीप्तीने काही रीयालिटि शो देखील केले आहेत त्यात अप्सरा आली आणि एक पेक्षा एक यांचा समावेश आहे .
दीप्ती केतकर हिच्या नवऱ्याचं नाव रोमित केतकर असं असुन त्यांना एक मायरा नावाची ९ वर्षांची मुलगी आहे .
तुम्हांला अभिनेत्री दीप्ती केतकर हिची येऊ कशी तशी मी नांदायला ह्यातील नलू ची भूमिका कशी वाटते हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे जरूर सांगा.