बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अभिनेता विशाल निकम बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेता विशाल निकम याचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ ला सांगली जिल्ह्यातील देवखिंडी येथे झाला. त्याने त्याच शालेय शिक्षण N.S विद्यालय देवखिंडी येथून पुर्ण केलय तसेच , त्याने B.SC चे शिक्षण हे बाळवंत कॉलेज मधुन पुर्ण करून पुण्यातील बाबुराव घोलप कॉलेज मधुन M.SC चे शिक्षण पुर्ण केलय .
त्यानंतर त्याने सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला आणि २०१८ मध्ये मिथुन या चित्रपटातून त्याने कलाक्षेत्रात पदार्पण केल. यामध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे आणि विशाल या दोघांची जोडी मुख्य भुमिकेत दाखवण्यात आलेली. त्यानंतर २०१९ मध्ये धुमस या चित्रपटात देखील अभिनेता विशाल निकम दिसून आला. त्याबरोबरच स्टार प्रवाह वरील ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत विशाल युवराजच्या मुख्य भुमिकेत दिसून आला. आणि याच वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ यात ज्योतिबाची मुख्य भूमिका तर ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेंमध्ये महत्वपुर्ण भूमिका त्याने साकारली होती.
आणि आता अभिनेता विशाल निकम याला आपण बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये पाहतच आहोत.