कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. ही मालिका एक पौराणिक मालिका आहे. या मालिकेत अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची जीवनगाथा आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांअगोदर या मालिकेचे 750 भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेचे कलाकार काही दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर यांना पाहताच प्रेक्षकांची खूप गर्दी जमली होती.
या मालिकेत आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एक नवी एन्ट्री होणार आहे. या मालिकेत स्वामीसुत पर्वाची सुरुवात होणार आहे. स्वामींचा प्रिय सुत म्हणजेच स्वामीसुत यांचा आरंभ या मालिकेत होणार आहे. हरिभाऊ तावडे म्हणजेच स्वामीसुत यांना स्वामींनी आपले पुत्र मानले होते. स्वामींचे हे लाडके स्वामीसुत होते. आता या स्वामीसुतांची भूमिका आपला लाडका अभिनेता विकास पाटील साकारणार आहे. या भूमिकेचा लुक ही प्रेक्षकांसमोर आला आहे.
या भूमिकेविषयी विकास म्हणतो, हि भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्वामींनी त्यांना आपले पुत्र म्हणून मानले होते. विकास पुढे म्हणतो या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे कारण मी स्वतः एक निस्सीम स्वामी भक्त आहे. स्वामीसुतांची भूमिका हि माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे, प्रेक्षकही या पात्रावरती खूप प्रेम करतील अशी मला आशा आहे.
अभिनेता विकास पाटील याने खूप साऱ्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनीच्या भावाची भूमिका करत आहे. या मालिकेत त्याच्या भूमिकेचे नाव राहुल असे आहे. संत गजानन शेगावीचे, चार दिवस सासूचे, कुलवधू, लेक माझी लाडकी,वर्तुळ,बायको अशी हवी अशा बऱ्याच मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. त्याला मराठी बिग बॉस सीजन ३ मध्ये आपण पाहिले होते. या पर्वामध्ये प्रेक्षकांनी विकासला खूप पाठिंबा दिला आणि खूप प्रेमही दिलं. या सिजनमध्ये त्याची विशाल निकम सोबत असलेली मैत्री आजपण प्रेक्षकांना खूप आठवते. त्याला आपण सकारात्मक, नकारात्मक अशा भूमिकांमध्ये पाहिले आहे.
स्वामीसुत या नव्या भूमिकेत विकासला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.