अभिनेत्री विद्या सावळे यांची राजा रानीची ग जोडी या मालिकेत धमाकेदार एंट्री

कलर्स मराठीवरील ‘राजा राणी ची ग जोडी’ ही मालिका आता एक वेगळ्या वळणावर गेली आहे. यात आपण आता संजूला मालिकेत PSI संजीवनी रंजीत ढाले पाटील म्हणून पाहत आहोत. त्याचप्रमाणे या मालिकेत आता नविन पात्राची एंट्री होणार आहे. मालिकेतील एका प्रोमो मध्ये रंजीत संजीवनीला बुलेटची चावी देतो संजीवनी गाडीवर बसताच तो म्हणतो की,आता कशी रुबाबदार दिसतेय माझी फौजदार त्यावर एक आवाज मागून येतो की एक दिवस हा रुबाब नाही उतरवला तर नावाची गुलाब नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गुलाब या नविन एंट्री होणाऱ्या पात्राचं नाव आहे अभिनेत्री विद्या सावळे. एंट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत न्यू रोल , न्यू चॅलेंज असं कॅप्शन त्यांनी दिले आहे. अभिनेत्री विद्या सावळे यांना आपण याआधी ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत शिवाच्या आईच्या भुमिकेत पाहिले आहे त्याचप्रमाणे ‘लगिर झालं जी’ या मालिकेत अजिंक्यच्या मामीच्या भुमिकेत देखील पाहिले आहे आणि आता त्यांना आपण राजा रानीची ग जोडी या मालिकेत पोलिसाच्या भुमिकेत पाहणार आहोत.

 तुम्ही अभिनेत्री विद्या सावळे यांना पोलिसाच्या भुमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.  

Leave a Comment