स्टार प्रवाह वाहिनी वरील रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकचा दिपाबद्दलचा गैरसमज अजूनही दूर होत नाहीये. दीपाच्या पोटातील बाळं माझी नाही असा कार्तिकचा ठाम विचार असल्यामुळे दोघेएकमेकांपासून दूर आहेत. त्यातच आता मालिकेत आयशा देशमुख या नविन पत्राची एंट्री होणार आहे. आयशा ही भूमिका अभिनेत्री विदिशा म्हसकर साकारत आहे. या मालिकेत ती निगेटिव्ह रोल मध्ये दिसणार आहे. आता हे पात्र कार्तिक दिपाच्या आयुष्यात कोणते नविन वादळ आणणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. अभिनेत्री विदिशाने या आधी बऱ्याच मालिकेंमध्ये कामं केली आहेत त्यात सुखाच्या सरीने हे मनं बावरे , ती फुलराणी , बन म्हस्का , आणि चांदणे शिंपीत जाशी या मालिकेंचा समावेश होतो. स्टार प्रवाह वरील कॉमेडी बिमेडी या कॉमेडी शो मध्ये देखील ती दिसून आली .
तर तुम्ही विदिशा म्हसकरला ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत पाहायला उत्सुक आहात का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.