विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उत्कर्ष शिंदे यांनी बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली आहे. गाण्यात त्याला साथ द्यायला गायक आदर्श शिंदे हे आपल्याला पाहायला मिळाले या घरात जाणारा चौथा स्पर्धक उत्कर्ष शिंदे हा सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा हा मुलगा आहे. उत्कर्ष हा व्यवसायाने डॉक्टर जरी असला तरी त्याला गाण्याची तितकीच आवड आहे. आनंद शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यक्रमामध्ये उत्कर्षची झलक आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या सर्व गाण्यांना प्रेक्षकांनी खुप प्रेम दिले आहे.
उत्कर्ष आता बिग बॉसच्या घरात काय कमाल करणार हे पाहण उत्सुकतेच असणार आहे.