‘रंग माझा वेगळा’ मालिकेत पाहायला मिळणार नविन ट्विस्ट

स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका खुप लोकप्रिय आहे. यातील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मालिकेत दीपा आणि कार्तिकने एकत्र यावे असे दीपिका आणि कार्तिकी सोबतच सर्वच प्रेक्षकांना वाटतय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सोशल मीडियावर या मालिकेचा सध्या एक प्रोमो वायरल होतोय. ज्यात कार्तिक कार्तिकी आणि दीपिकाला चॉकलेट देत असतो. आणि दीपिका त्याला थॅंकु अंकल म्हणते तर कार्तिकी म्हणते तु अजुन एक चॉकलेट आणायला हवं होतं. तर कार्तिक बोलतो तुला आणखी एक चॉकलेट हवं होत का ? त्यावर कार्तिकी म्हणते , माझ्यासाठी नाही तर दीपा अंटी साठी . तिने पण कीती छान काम केल. प्रोमोमध्ये आपल्याला दीपा देखील सुंदर तयार झालेली दिसून येतेय .

दीपाच रूप पाहून कार्तिक तिच्याकडे पाहतच राहतो. तिच्याकडे पाहून कार्तिक तिचं कौतुक करतो. सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत की कार्तिक दीपा एकत्र येणार का ? ते त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन पुन्हा त्यांच नात पाहिल्यासारख होणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष लागलय .

तर तुम्हांला ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आवडते का ? ही कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment