una Furniture Box Office Collection : महेश मांजरेकर यांचा ‘जुन फर्निचर ‘ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला, आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. एक आगळवेगळ कथानक असणाऱ्या या चित्रपटाला पाहण्यासाठी लोक खूप गर्दी करू लागले आहेत . प्रथमच निर्माता बनलेले महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर यांनी मीडिया शी संवाद साधला आणि ते म्हणाले की, पप्पांनी एक वेगळ कथानक असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटली आणला आहे, आणि याच मला खूप कौतुक वाटतं.
जुनं फर्निचर या नावातच या चित्रपटाची कथा दडलेली आहे. एखादं अडगळीच सामान म्हणून आपण जुन्या फर्निचरकडे पाहत असतो पण त्यांची यावयातही लढायची ताकद तेवढीच दांडगी आहे.
हा चित्रपट बनवावा म्हणून महेश मांजरेकर गेली दहा वर्षे प्रयत्नात होते. या भूमिकेला योग्य न्याय देता यावा म्हणून त्यांनी स्वतःच भूमिकेसाठी कास्ट केले होते. दरम्यान जुनं फर्निचर हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बॉक्सऑफिसवर शुक्रवारी फक्त ४० लाखांचा गल्ला जमवता आला. पण शनिवारी आणि रविवारी विकेंडमुळे प्रेक्षकांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतो आहे.
काल शनिवारी चित्रपटाने ७२ लाखांचा गल्ला आपल्या खात्यात जमा केलेला आहे. तर आज रविवारचे औचित्य साधून काही ठिकाणी लोकांनी हाऊसफुल्ल गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्वतः महेश मांजरेकर यांनी चित्रपटगृहात हजेरी लावली होती. त्यामुळे दोन दिवसांच्या तुलनेत आजचा कमाईचा आकडा हा अधिक असणार हे खात्रीपूर्वक सांगता येईल. दरम्यान आजच्या कमाईची आकडेवारी ही उद्याच्या अहवालात पाहायला मिळणार आहे.
दोन दिवसांत चित्रपटाने १ कोटी १२ लाखांची कमाई केली असली तरी हा आकडा तुलनेने जास्त आहे असे म्हणावे लागेल. पण या आठवड्यात हा चित्रपट लोकांची चांगली पसंती मिळवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा :
Aai Kuthe kay karte : आशुतोष च्या जाण्यामुळे माझी मनस्थिति खूप जास्त.. म्हणून मी..
Kunya Rajachi Ga Tu Rani – स्टार प्रवाह ची ही लोकप्रिय मालिका होणार बंद!