अभिनेत्री उमा पेंढारकर बद्दल बरचं काही

झी मराठी वाहिनी वरील ‘अग्गंबाई सासुबाई’ ह्या मालिकेचा दुसरा भाग लवकरच म्हणजे 15 मार्च पासुन रात्री 8.30 वाजता ‘अग्गबाई सुनबाई’ ह्या नावाने सुरू होत आहे. पण हयात काही पात्र बदलण्यात आलेली आहेत ती म्हणजे शुभ्रा आणि सोहम यांची , अग्गंबाई सुनबाई ह्या मालिकेत तेजश्री प्रधान म्हणजेच शुभ्राचं पात्र साकारणार आहे अभिनेत्री उमा पेंढारकर तर आशुतोष पत्की म्हणजे बबड्याचं पात्र साकारणार आहे अद्वैत दादरकर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर आज आपण जाणून घेणार आहोत शुभ्राचं पात्र साकारणाऱ्या उमा पेंढारकर बद्दल .

अभिनेत्री उमा पेंढारकर हीच पुर्ण नाव उमा ऋषिकेश पेंढारकर असं आहे . ही मुळची रायपाटण गावची आहे . तीच महाविद्यालयीन शिक्षण हे रामनारायण रुईया महाविद्यालयात पुर्ण झालेलं असुन ती एक प्रोफेशनल counselor आहे. त्याचबरोबर तीला नृत्याची देखील फार आवड असुन ती कथ्थ्कमध्ये पारंगत आहे. तसेच तिने शास्त्रीय संगीताचे देखील धडे घेतले आहेत आणि गाण्याचे कार्यक्रमही केले आहेत.

तिने प्रशांत दामले यांच्या संशय कल्लोळ ह्या नाटकात देखील काम केल आहे यात तीला प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. त्यानंतर तिने कलर्स मराठी वरील ‘स्वामिनी’ ह्या मालिकेत पार्वतीबाई यांची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली. उमाची ‘स्वामिनी’ ही पहिलीच मालिका होती . ह्या मालिकेमुळे , त्यात तिने साकारलेल्या पात्रामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

उमा पेंढारकर हिच्या नवऱ्याच नाव ऋषिकेश पेंढारकर असुन तो एक architheque आहे . तसेच त्यांना देखील शास्त्रीय संगीताची आवड आहे .

तर तुम्ही उमा पेंढारकर हिला शुभ्राच्या भुमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का ? हे आम्हांला कॉमेंट्स  करून जरूर कळवा .  

Leave a Comment