तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई होणार

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या चर्चेत आहे. धनश्री सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर नवं-नवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतीच धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विडिओ पोस्ट करून एक गोड बातमी शेयर केली आहे. अभिनेत्री धनश्री प्रेग्नेंट असून लवकरच आई होणार आहे. तिच्या या विडिओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

धनश्री काडगावकर डिसेंबर २०१३ रोजी ध्रुवेश देशमुख सोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत.  ध्रुवेश देशमुख व्यवसायाने इंजिनीयर आहे. ध्रुवेश धनाश्रीपेक्षा ४ वर्षांनी मोठा आहे. धनश्रीचे माहेर आणि सासर पुण्यातच आहे.  

धनश्रीने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ‘जन्मगाठ’, तुझ्यात जीव रंगला या मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर हि एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याबरोबरच एक उत्त्तम डान्सर देखील आहे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ आणि ‘डाँसिन्ग क्वीन’ या डान्स रिऍलिटी शो मध्ये ती टॉप १० स्पर्धकांपैकी एक होती. या कार्यक्रमातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली.

https://www.instagram.com/p/CGKWPyDBDhV/

Tags : Dhanashri Kadgaonkar Pregnancy

Leave a Comment