तुझ्यात जीव रंगला मालिका होणार बंद, येणार नवीन मालिका

लॉकडाउन काळात अनेक मालिकांच्या चित्रीकरणामध्ये अडथळा येत होता. कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांच्या शूटिंगची ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे जुन्या मालिका संपवून त्याजागी नवीन मालिका सुरु करण्यात आल्या. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘कारभारी लयभारी’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारभारी लयभारी या नव्या मालिकेचे प्रोमोज सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. कारभारी लयभारी यामालिकेत अभिनेता निखिल चव्हाण हा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अभिनेत्री अनुष्का सरकटे हि प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. हि मालिका राजकारण आणि प्रेमकहाणीवर याआधारित असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कारभारी लयभारी ही नवीन मालिका 2 नोव्हेंबर पासून संध्याकाळी 7.30 वाजता दिसून येणार आहे. त्यामुळे झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला हि लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याचे समजते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेला ४ वर्षे पूर्ण झाली असून या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे.  तर मित्रांनो तुझ्यात जीव रंगला ही मालिका बंद व्हावी की नाही यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Tuzhyat Jeev Rangala End, Tuzyat Jiv Rangala off air

4 thoughts on “तुझ्यात जीव रंगला मालिका होणार बंद, येणार नवीन मालिका”

  1. कोणत्याही मालिका थोडक्या अवधीत समाप्त केल्या की लोकांना आवडतं

    Reply
  2. लयच उगाच लंबावनिवर घेऊन जात होते ह्या मालिकेला बर झाल बंद झाली ते👍I like it .not interested this serial now

    Reply
  3. बरं होईल बंद झाली तर खूप खेचून ताणून वाढवत आहेत मालिका. कंटाळा येतो पाहताना.

    Reply

Leave a Comment