अखेर तुझेच मी गीत गात आहे मालिका बंद होण्यामागचं खरं कारण आलं सर्वांसमोर!

स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने दोन वर्षानंतर अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं होतं. या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, उर्मिला कोठारे आणि तेजस्विनी लोणारी यांसारखे लोकप्रिय कलाकार होते. या मालिकेतील स्वरा आणि पिहूने तर प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं होतं.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकांना देखील टीआरपी मध्ये मागे टाकले होते. या मालिकेत आपल्याला खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळाले. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका स्टार प्लस वरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकेचा remake होता. कुल्फी कुमार बाजेवाला ही मालिका देखील प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली होती. स्टार प्रवाह च्या अजूनही काही मालिका आहेत ज्या कोणत्या ना कोणत्या मालिकेचा रिमेक आहेत.

सुरुवातीला म्हटलं गेलं होतं की ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आल्यानंतर तुझेच मी गीत गात आहे ही मालिका बंद होईल, परंतु तसे काही झाले नाही. परंतु आता 17 जून पासून स्टार प्रवाह वर थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका सुरू होत आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेमुळे तुझेच मी गीत गात आहे ही मालिका बंद करण्यात येत आहे, शिवाय या मालिकेचा टीआरपी देखील कमी झाला होता. त्यामुळे चॅनलने ही मालिका बंद करून त्या जागी थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवीन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर मित्रांनो तुम्ही तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला मिस कराल का आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment